Buldhana: Terrible accident on Samrudhi Highway; A truck carrying an iron spear overturned, killing 13 workers

हा अपघात इतका भीषण होता की ट्रक पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दाबले गेलेत. तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.

    बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे(Terrible accident on Samrudhi Highway). लोखंडी सळई घेऊन ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात 13 मजूर ठार झालेत तर 12 मजूर जखमी झाले आहेत. जखमीपैकी पाच मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

    जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामावरील हा ट्रक  लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

    हा अपघात इतका भीषण होता की ट्रक पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दाबले गेलेत. तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.