आपे आणि बोलेरो वाहनादरम्यान टक्कर

बुलढाणा (Buldhana):   जिल्ह्यातील धामनगाव येथील मोठ्या ठाण्यांतर्गत लालमाती फाट्याजवळ मंगळवारच्या दुपारी 3 वाजता आपे आणि महिंद्रा बोलेरो वाहनादरम्यान टक्कर झाली. या अपघातात आपे चालक सहीत ६ प्रवाशी जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. महितीनुसार आपे क्रमांक एमएच-१९ एएक्स-०९२४ हा प्रवाशांना घेऊन वाहजल फाट्याजवळून धामनगाकडे जात होता. या दरम्यान महिंद्रा बोलेरो क्र.जीजे-१९ एएम-००५० ने लालमाटीपासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या अॅपेला जबरदस्त धडक दिली आणि वाहनासह पळ काढला.

अपघातात अॅपे चालक सुनील आमले रा. धामनगाव आणि लक्ष्मी सोनोने रा. घानेगाव जि. औरंगाबाद हे दोधे गंभीर जखमी झाले. आपेत बसलेले श्यामराव काण्डलेकर निवासी हनतखेड़, नारायण सोनोने निवासी घानेगाव, सुधाकर खराटे निवासी सिंदखेड़, निर्मला गनवास निवासी मलकापुर सुद्धा गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना खासगी वाहनाने धामनगाव येथील आरोग्य केंद्रावर उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.