कोरोना लस, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करा- आ. ॲड. आकाश फुंडकर

कोरोना संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कोरोना लस व रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पालकमंत्री रेमेडीसीवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे म्हणतात तर दुसरीकडे येथील सामान्य रुग्णालयात 95 टक्के इंजेक्शन्स बाहेरुन आणावे लागत आहेत.

    खामगांव (Khamgaon).  कोरोना संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कोरोना लस व रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे पालकमंत्री रेमेडीसीवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे म्हणतात तर दुसरीकडे येथील सामान्य रुग्णालयात 95 टक्के इंजेक्शन्स बाहेरुन आणावे लागत आहेत.

    या स्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधितानी पाठपुरावा करुन उपाय योजना कराव्या,असे निर्देश आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले. तहसील कार्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात आमदार आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    बैठकीला उपविभागीय अधिकारी जाधव, तहसीलदार रसाळ, मुख्याधिकारी आकोटकर, गटविकास अधिकारी राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी खिरोडकार, निवासी वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हुड, नगराध्यक्ष अनिता डवरे, आरोग्य सभापती ओम शर्मा, सभापती सीमा वानखडे, शिवानी कुळकर्णी, जाकियाबानो अनीस जमादार, पंचायत समिती सभापती मोरे, उपसभापती तुषार गांवडे, रुग्ण कल्यास समिती सदस्य़ राम मिश्रा, आयएमएचे अध्यक्ष डॉ.हरिभाऊ वडोदे, संतोष वानखडे, शोहरत खान, रोटरी क्लब सदस्य विजय शर्मा, राहुल खंडेलवाल,अलोक सकळकळे उपस्थित होते. ओम शर्मा यांनी नागरिकांना येत असलेल्या समस्या मांडल्या. डॉ. निलेश टापरे यांनी रॅमडीसीवर व कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली.