रजतनगरीत चांदीच्या गणेशमूर्तीची मागणी वाढली; बाजारपेठ गजबजली

चांदीच्या किमतीमध्ये देखील घसरण झाल्याने खामगाव येथील चांदीची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजली असून, राज्यासह संपूर्ण देशभरातून ग्राहक चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तू घेतांना दिसत आहेत.

    खामगाव (Khamgaon) : देशभरात गणेश उत्सव (Ganesh Utsav) मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. गणेशोत्सव म्हटलं की गणेशाची सुंदर, सुबक, आकर्षक अशी मूर्ती स्थापित केल्या जाते; मात्र आता चांदीच्या गणेश मूर्तीला (silver idol of Ganesha) मोठया प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. चांदी म्हटलं की, देशभरात रजतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या गणेश मूर्त्याना (silver Ganesha idol at Khamgaon) यावर्षी मोठी मागणी आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी असलेल्या चांदीच्या मुर्त्या आणि इतर साहित्य हे देखील खामगाव येथील आहेत.

    गेल्यावर्षी कोरोणा महामारीच्या लोकडाऊन मुळे गणेश उत्सवांवर निर्बंध असल्याने खामगाव येथील बाजारपेठेमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला आणि या व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणात मंदी आली होती; मात्र आता कोरोना कमी झाल्याने गणेश उत्सव वरील अनेक निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये चांदीच्या किमतीमध्ये देखील घसरण झाल्याने खामगाव येथील चांदीची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजली असून, राज्यासह संपूर्ण देशभरातून ग्राहक चांदीच्या मूर्ती आणि इतर वस्तू घेतांना दिसत आहेत.

    चांदीच्या शुद्धतेमुळे खामगावची ओळख आहे , या शहरात चांदीची मोठी बाजारपेठ आहे. चांदीच्या मुर्त्या , घरातील विविध वस्तू बनविणारे कारखाने या शहरात आहेत, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू येथील कारागीर या कारखान्यांमध्ये काम करतात. अत्यंत सुबक अशा 10 ग्राम पासून ते 40 किलो पर्यंतच्या चांदीच्या गणेश गणेश मुर्त्या येथे तयार केल्या जातात. त्यामुळे देशभरातील ग्राहक , राजकारणी , क्रिकेटपटू यासह विविध क्षेत्रातील दिग्गज हस्ती येथूनच चांदीचे भांडी , मुर्त्या ऑर्डर करून मागवतात. सध्या चांदीचे कमी झालेले भाव आणि अनलॉक यामुळे यावर्षी चांदीच्या गणेश मूर्त्याना मागणी वाढल्याचं येथील विक्रेते सांगतात.