कोरोना काळात स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा : दिलीपकुमार सानंदा

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती भयंकर होत आहे. त्यातही रक्ताची चणचण भासत असल्याने या बाबत जनजागृती तसेच स्वसंस्फूर्त रक्तदान करण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

    खामगाव (Khamgaon).  कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती भयंकर होत आहे. त्यातही रक्ताची चणचण भासत असल्याने या बाबत जनजागृती तसेच स्वसंस्फूर्त रक्तदान करण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

    लसीकरणामुळे कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये घट होणार आहे. लसीकरण ‘सुरक्षा कवच’ असल्याने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन गावागावात जनजागृती करावी. त्यासाठी गावागावात स्टीकर्स लावावे, आशा, अंगणवाडी सेविका ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून लसीकरण तसेच रक्तदानाबाबत जनजागृती करावी असेही सानंदा काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना म्हणाले.

    तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोले, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ,नगरसेवक इब्राहिमखा सुभानखा, पं.स.सदस्य मनीष देशमुख, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, सुरेशसिंह तोमर,गजानन वाकुडकर, तुषार चंदेल, रोहीत राजपूत, मंगेश इंगळे उपस्थित होते.