पूर्णा नदीला महापूर; पुलावरची वाहतूक ठप्प

    नांदुरा (Nandura) : उपनद्यांना आलेला पूर व धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूर्णा नदी ओसंडून वाहत आहे. रविवार, ३ ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजेदरम्यान मानेगाव येथील पुलावरुन पूर्णा नदीच्या पुराचे पाणी वाहू लागल्याने नांदुरा-जळगावजामोद दरम्यानची वाहतूक या मार्गाने ठप्प झाली आहे. मागील आठ दिवसांपासून पूर्णा नदी दुथडी भरून वाहत होती.

    रविवारी, ३ ऑक्टोबरच्या सकाळी पुराचे पाणी नांदुरा ते जळगाव दरम्यान मानेगाव नदीच्या पुलावरून वाहू लागल्याने या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे . जळगाव जामोदला जाण्यासाठी खिरोडा व मांडवा या दोन उंच पुलांची कामे पूर्ण झाल्याने यावरुन आता वाहनधारकांना जावे लागत आहे. तर मारगील दशकापासून सुरू असलेले एरळीजवळील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.