Four to four feet of water from the Purna river bridge; Nandura-Jalgaon road closed for traffic

बुलडाणा जिल्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तर काही भागात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पुर्णा नदीच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरू आहे.लहान मोठी धरणेही पाण्याने तुडुंब भरलेले असल्यामुळे त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे नदिपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून नदीला मोठा पूर आलेला आहे.

    बुलडाणा : अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पुर्णा नदिला पूर आल्यामुळे माणेगाव येरळीच्या मधोमध असलेल्या पुर्णा नदिला पुर आल्यामचळे सदर पुलावरुन चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे जळगाव जामोद – नांदुरा मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद झाला करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

    मागील दोन ते तीन दिवसापासून बुलडाणा जिल्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तर काही भागात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पुर्णा नदीच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरू आहे.लहान मोठी धरणेही पाण्याने तुडुंब भरलेले असल्यामुळे त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे नदिपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून नदीला मोठा पूर आलेला आहे.

    पुर्णा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी सध्या वाहत आहे. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यातील गावांचा संपर्कही तुटला आहे.