मका पीकात रान डुकरांचा हैदोस, शेतकरी अडचणीत वनविभागाचे दुर्लक्ष

बुलडाण्यातील संग्रामपुर तालुक्यात गत वर्षी कापूस पिकावर बोंडअळीचे संकट आले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हंगामी सोयाबीन सोबत मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच मक्याची कणसेही चांगल्या प्रकारे भरण्यास सुरुवात झाली होती. यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. परंतु वन्य प्राणी आणि रानडुकरांनी शेतीची नासधूस केल्याने मोठे नुकसान झाले आहे.

बुलडाणा : बुलडाण्यात वन प्राणी रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. मका पीका या रान डुकरांनी फस्त केले आहे. त्यामुळे शेतकरी रामदास अस्वार यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. (neglect of forest department in farmers difficulty)

बुलडाण्यातील संग्रामपुर तालुक्यात गत वर्षी कापूस पिकावर बोंडअळीचे संकट आले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हंगामी सोयाबीन सोबत मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच मक्याची कणसेही चांगल्या प्रकारे भरण्यास सुरुवात झाली होती. यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. परंतु वन्य प्राणी आणि रानडुकरांनी शेतीची नासधूस केल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या परिसरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. आणि नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु वन्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे वारंवार तक्रार केली असूनही वन विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत तसेच शेतीचा पंचनामा करण्यात आला नाही.