बारावीत मिळाले ८० टक्के गुण, ‘या’ विषयात कमी गुण आल्याने केली आत्महत्या

  • आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव संतोष लांडे (१८) असे आहे. तो कॉमर्स मधून बारावी उत्तीर्ण झाला. परंतु इंग्रीजी विषयात ५६ गुण मिळाल्याने संतोष निराश झाला. या निराशामुळे संतोषने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेले गुण आपेक्षे पेक्षा कमी असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. सकाळी ६ च्या दरम्यान संतोष शेतात गेला आणि तिकडे जाऊन त्याने आपली जीवन यात्रा संपविली.

चिखली – शेतकरी कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने मोठ्या संघर्षाने बारावी वाणज्य शाखेतून ८० टक्के गुण मिळविले. परंतु एका विषयात कमी गुण मिळाल्याने नैराश्येच्या गर्तेत अटकला. या नैराश्यामधून त्याने टोकाचे पाऊल ऊचलले. त्याने शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. मुलाने उचललेल्या पावलमुळे कुंटूंबातील लोकांना धडकी भरली आहे. संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. हि घटना चिखली तालुक्यातील कव्हळा गावात घडली आहे. शुक्रवार सकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. 

आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव संतोष लांडे (१८) असे आहे. तो कॉमर्स मधून बारावी उत्तीर्ण झाला. परंतु इंग्रीजी विषयात ५६ गुण मिळाल्याने संतोष निराश झाला. या निराशामुळे संतोषने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेले गुण आपेक्षे पेक्षा कमी असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. सकाळी ६ च्या दरम्यान संतोष शेतात गेला आणि तिकडे जाऊन त्याने आपली जीवन यात्रा संपविली.