रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांट स्थापन करावा; अन्न व औषध प्रशासन विभाग परवाना देण्यास तयार

कोविडचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असल्याने ऑक्सिजनची गरज आहे. कमतरता भासू नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट स्थापन करावा, अन्न व औषधी प्रशासन विभाग परवाना देण्यास तयार आहे, अशी तयारी विभागाने दाखवली आहे.

    बुलढाणा (Buldhana).  कोविडचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असल्याने ऑक्सिजनची गरज आहे. कमतरता भासू नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट स्थापन करावा, अन्न व औषधी प्रशासन विभाग परवाना देण्यास तयार आहे, अशी तयारी विभागाने दाखवली आहे.

    जिल्ह्याला आवश्यक मेडिकल ऑक्सिजन बाहेरील जिल्ह्यातून बोलवावा लागतो. तेथून पुरवठा न झाल्यास ऑक्सिजनअभावी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, उद्योजक, ऑक्सिजनची गरज असणारी रुग्णालये यांनी पुढे यावे. ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसवावे. जेणेकरून ऑक्सिजनअभावी रुग्णांचे संरक्षण होईल. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे परवाना मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले.