बुलडाण्यात आढळले ७२ कोरोनाबाधित, १०६ जणांची कोरोनावर मात

  • जिल्ह्यात आज अखेर एकूण १८४० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ११२५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ६८० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४५० अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ७२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४३ व रॅपिड टेस्टमधील २९ अहवालांचा समावेश आहे. 

निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ६६ तर रॅपिड टेस्टमधील ३८४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४५० अहवाल निगेटीव्ह आहेत. आज रोजी २२७ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ११९८८ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १८४० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ११२५ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ६८० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.