Edotorial

  •  ४०१ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'
  • २७३ रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६१९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४०१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून २१८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १८५ व रॅपिड टेस्टमधील ३३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २१२ तर रॅपिड टेस्टमधील १८९ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ४०१ अहवाल निगेटीव्ह आहेत.

तसेच आजपर्यंत २४०९७ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ४०३३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ४०३३ आहे.
आज रोजी १४७४ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २४०९७ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ५२५४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ४०३३ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ११५५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.