बुलडाणा जिल्ह्यात विषाणु जन्य आजाराने घातले थैमान; सर्व रुग्णालये हाउसफुल्ल

जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, त्यात आता व्हायरल फ्ल्यूने हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत,तसेच जिल्ह्यात मलेरिया चे 3 रुग्न तर डेंग्यू चे 7 रुग्न आढळले आहेत

    जिल्ह्यातील बदलत्या वातावरनामुळे विषाणु जन्य आजाराने थैमान घातले असून बुलडाणा जिल्ह्यातील सरकारी व खाजगी रुग्णालये हाउसफुल झाले आहेत, तसेच कोरोनाचा काळ संपलेला नाही, जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, त्यात आता व्हायरल फ्ल्यूने हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत,तसेच जिल्ह्यात मलेरिया चे 3 रुग्न तर डेंग्यू चे 7 रुग्न आढळले आहेत, त्यांमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

    रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल झालेले आहे. या विषाणु जन्य आजारावर उपचारसाठी संपूर्ण औषधसाठा मुबलक असल्याने चिंता करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा श्यल्य चिकित्सक डॉ.नितिन तड़स यानी दिली आहे.