शिवसेनेने स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करणे हास्यास्पद; संकुचित वृत्तीच्या लोकांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही– चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस

असा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये काय ५० मध्येही येऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा, लोकच तुम्हाला सांगतील की, असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही आणि पहिल्या पाचमध्ये येणे शक्य नाही.-- चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री

    बुलडाणा (Buldana) : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP leader and Union Minister Narayan Rane) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेनेने (the Shiv Sena) स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करणे हे हास्यास्पद आहे. हे त्यांच्या संकुचित विचार बुद्धीचं लक्षण आहे. संकुचित विचारसरणीने माणूस कधीही मोठा होत नाही, अशा संकुचित वृत्तीच्या लोकांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते बुलडाण्याच्या सिंदखेडराजा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

    असा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये काय ५० मध्येही येऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेला विचारा, लोकच तुम्हाला सांगतील की, असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही आणि पहिल्या पाचमध्ये येणे शक्य नाही. विदर्भात अधिवेशन घ्यायला जे घाबरतात, ते मुख्यमंत्री उत्कृष्ट कसे असू शकतात, असाही सवाल बावनकुळे यांनी केला.

    भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने २३ ते २६ ऑगस्ट असा पश्चिम विदर्भ युवा वारियस प्रवास यात्रा काढण्यात येणार आहे.यात्रेची सुरुवात आज सोमवारी २३ ऑगस्टला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्म स्थळापासून सुरू करण्यात झाले आहे.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.