बिल वसुली करायला आलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विद्युत बिलाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी गायगाव खुर्द येथे गेलेल्या कर्मचाऱ्याला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशा तक्रारीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शेगाव (Shegaon). विद्युत बिलाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी गायगाव खुर्द येथे गेलेल्या कर्मचाऱ्याला तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशा तक्रारीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, शत्रुघ्न गावंडे शेगाव येथे विद्युत वितरण कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

    11 मार्च रोजी शत्रुघ्न गावंडे गायगाव खुर्द येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेले असता आरोपी राजेंद्र सोनोने व त्याच्या दोन साथीदारांनी आमच्या घरी विद्युत बिलाची वसुलीसाठी कसे काय गेले होते, असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच अंगावर धावून चापटा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी तिघा आरोपीविरुद्ध भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे हे करीत आहेत.