राज्यात फक्त ५० हजार रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध; डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती

    बुलडाणा : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी प्रशासनापुढे चिंतेची बाब आहे. तर मुंबईमध्ये फक्त 2 दिवस पुरेल इतका लसीचा साठा शिल्लक आहे. आणि राज्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून त्या अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

    दरम्यांन बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना शिंगणे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या 50 हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत तर 17 एप्रिल प्रर्यत 70 हजार इंजेक्शन उपलब्ध होणार असून सध्याचा 50 हजाराचा आकडा कमी आहे तो वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

    राजेंद्र शिंगणे यांचे रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन

    खाजगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. याबाबत डॉ. शिंगणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, खाजगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का याची खात्री करन घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत असे आवाहनही यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केले आहे.