Corona Side Effects : शेगावमध्ये रुग्णांची निदर्शने ; गेटजवळ येऊन केला निषेध

विसावा कोविड केअर सेंटरमध्ये दोनशे ते अडीचशे रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना दुपारी २ पर्यंत भोजन कंत्राटदाराकडून भोजनाची व्यवस्था झाली नाही.

    आनंदसागर : विसावा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना वेळेवर भोजन न मिळाल्यामुळे १०० ते १५० कोरोना रुग्णांनी सेंटरच्या गेटवर येऊन संताप व्यक्त केला. शुक्रवारी हा गंभीर प्रकार समोर आला. संबंधित अधिकारी वेळीच दाखल झाल्यामुळे अनर्थ टळला.

    विसावा कोविड केअर सेंटरमध्ये दोनशे ते अडीचशे रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना दुपारी २ पर्यंत भोजन कंत्राटदाराकडून भोजनाची व्यवस्था झाली नाही.

    त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांनी विसावा इमारतीच्या गेटपर्यंत धाव घेतली. हा प्रकार नायब तहसीलदारांना कळविण्यात आला. नायब तहसीलदार व पोलिसही घटनास्थळी पोहोचले. कोरोना रुग्णांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

    भोजन कंत्राटदाराला विचारणा केली असता गॅसची नळी लिकेज झाल्यामुळे भोजन बनवण्यास विलंब झाल्याचे त्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने रुग्णांचे समाधान झाले आणि या प्रकरणावर पडदा पडला.