प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला ठेवल सामान्य रुग्णाच्या कक्षात; शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला सामान्य रुग्णाच्या कक्षात ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला. शेगाव येथील साईबाई मोटे शासकीय रुग्णालयात हा हलगर्जीपणा पहायला मिळाला आहे.

    बुलडाणा : प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला सामान्य रुग्णाच्या कक्षात ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला. शेगाव येथील साईबाई मोटे शासकीय रुग्णालयात हा हलगर्जीपणा पहायला मिळाला आहे.

    बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील एक महिला १५ फेब्रुवारीला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसूतिसाठी दाखल झाली होती. १६ तारखेला कोरोना चाचणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. मात्र, १६ तारखेलाच त्यांची प्रसुती करण्यात आली.

    प्रसुतीनंतर त्यांना सामान्य रुग्णांच्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. असे असताना त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला.