काळ्याबाजारात जाणारे रेशनचे 600 गव्हाचे कट्टे  पोलिसांनी केले जप्त; चालकावर गुन्हा दाखल

सदर ट्रक बाळापुर पोलीस ठाण्यात लावून गुन्हा दाखल करुन 28 वर्षीय ट्रकचालक शेख जावेद शेख ख्वाजा याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमची कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून 600 कट्टे (30 टन) गहू किंमत 20 लाख रुपये तसेच 6 लाखाचा ट्रक असा एकूण 26 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी API विलास पाटील यांनी दिली आहे.

    बुलडाणा – शासकीय वितरण प्रणालीचे 600 गव्हाचे कट्टे काळ्याबाजारात घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुलडाणा जिल्ह्यातील बाळापूर जवळ पोलिसांनी पकडले आहे. बाळापूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य रेशन माफिया अद्याप तरी मोकाट असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

    बुलडाणा जिल्हा प्रशासनाने खामगाव शहराबाहेर साई जिनिंग भरडधान्य ज्वारी व मका ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेले होते. मात्र हेच जिनिंग काळ्याबाजारात जाणाऱ्या शासकीय  धान्याचे मुख्य केंद्र बनले आहे. त्यामूळे, साई जिनिंगमध्ये भरड धान्य ज्वारी, मक्यासह रेशनचे इतर धान्यही ठेवले जाते. या ठिकाणी अवैधपणे गव्हाची साठवणूक केली जात होती. हाच गहू व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन करून अशा प्रकारे काळ्याबाजारात विकण्याचा गोरखधंदा सर्रासपणे सुरू असल्याचे समजते.

    ट्रक क्रमांक  AP 20 TB 4699 हा खामगांव येथील साई जिनिंग मधून गव्हाचे 600 कट्टे भरून अकोल्याच्या दिशेने काळ्याबाजारात विकण्यासाठी निघाला होता. परंतु, बाळापूर जवळ पोलीस पथकाने सदर ट्रक साई ढाब्याजवळ थांबवून ट्रकची झडती घेतली असता त्यात गहु आढळून आला. चालकाची विचारपुस केल्यावर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.