प्रदीप राठी दिड महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात

बहुचर्चित १४ प्लॉट व बनावट मुद्रांक खरेदीचे खोटे शासकीय कागदपत्र बनवण्याचे प्रकरणात आरोपी प्रदीप राठी यांना दीड महिन्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटळल्यानंतर प्रदीप राठी पोलिसांना शरण येतील अशी चर्चा होत होती.

    खामगाव (Khamgaon).  बहुचर्चित १४ प्लॉट व बनावट मुद्रांक खरेदीचे खोटे शासकीय कागदपत्र बनवण्याचे प्रकरणात आरोपी प्रदीप राठी यांना दीड महिन्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटळल्यानंतर प्रदीप राठी पोलिसांना शरण येतील अशी चर्चा होत होती.

    प्राप्त माहितीनुसार आरोपी प्रदीप यांनी १२ मार्च रोजी खामगाव येथे मालमत्ता विक्रीच्या उपनिबंधक कार्यालयात एक खरेदी व एक पॉवर ऑफ ॲटर्नी करुन दिले. त्यानंतर अकोल्याकडे गेले. दरम्यान पीएसआय अंभोरे यांनी माहितीच्या आधारे प्रदीप राठी यांना डॉ. शहा यांच्याकडे जात असताना सिटी कोतवाली पोलिसांच्या मदतीने अटक केली.

    त्यानंतर कोविड टेस्टसाठी त्यांना बुलडाणा मुख्यालयाकडे नेण्यात आले. तेथे कोविड टेस्ट निगेटिव्ह आली असून उशीरा रात्री त्यांना खामगाव पोलिस स्टेशनला आणण्यात आले. प्रदीप राठी विरुध्द अंजू सोनी यांनी तक्रार दिल्यानंतर 25 जानेवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.