सॅनिटायझर मशीन बंद; शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

कोरोना संसर्ग वाढला असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जोत आहे. परंतु बहुतांश शासकीय कार्यालयातील सँनिटायजर मशीन बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.

  खामगाव (Khamgaon).  कोरोना संसर्ग वाढला असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जोत आहे. परंतु बहुतांश शासकीय कार्यालयातील सँनिटायजर मशीन बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे़ यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात अडचणी येत आहेत. संबंधित अधिका-यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

  जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे़ संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ उपाय म्हणून शासकीय कार्यालयाच्या आवारात सँनिटायजर मशीन लावण्यात आल्या. लाखोंचा खर्च त्यावर झाला. मात्र मशिनी वापराअभावी धुळखात आहेत़ येथील कृउबास समिती, शहर पोस्टे, ग्रामीण पोस्टे, महसूल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय आदी ठिकाणच्या सॅनिटायझर मशीन भंगार अवस्थेत उभ्या आहेत़. यावर झालेला खर्च निरर्थक ठरला. शहरात दररोज शंभरावर पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहे़त.

  आरोग्य व्यवस्था हवालदिल झाली आहे़ अनेक रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि रेमडिसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेक रूग्ण अडचणीत सापडले असून अनेक रूग्णांनी आपले प्राण गमावले आहेत़ संगर्साला आळा घालण्यासाठी आवश्यक सॅनिटायजर, मास्क, सोशल डिस्टनसिंगचा वापर नागरिकांकडून होत नसल्याने प्रसार वाढत आहे़ शासकिय कार्यालयातील सॅनिटायजर मशीन सुरू करण्याची मागणी होत आहे़.

  पाच दिवसापूर्वीच सॅनिटायजर फवारणी सुरू केली – आकोटकर
  शहरात नुकतेच सँनिटायजरची पवारणी सुरू करण्यात आली आहे़ शहरातील ज्या वार्डात कोरोना रूग्ण आढळून येत आहे़ त्या घराला कंटेनमेंन्ट झोन घोषित करण्यात आले आहे़ तसेच ऩप़ मध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांना ऩ. प.मध्ये न येता त्यांना आँनलाईन तक्रारी आणि अडचणी सोडविल्या जात आहे. तसेच ऩ. प.च्या प्रवेश व्दाराजवळही नागरीक आणि कर्मचारी अधिकाºयांसाठी सँनिटायजर मशीन लावण्यात आलेली आहे.

  शहरात पुन्हा ९९ रूग्ण पॉझिटिव्ह
  खामगाव शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असून २४ एप्रील रोजी शहरात पुन्हा ९९ रूग्णांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे़ त्यामुळे शहरातील परिस्थिती आणखीनच भयानक झाली आहे़ शासकिय कोव्हीड रूग्णालयात रूग्णांसाठी बेड उपलब्ध नाही़ आँक्सिजनची कमतरता आहे़ त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे.