शेगावचे संत गजानन महाराज मंदिर नवरात्री उत्सवात भाविकांसाठी होणार खुले; प्रशासनाचा निर्णय

प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती, इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.नियमानुसार ६ फुटाचे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल.

    शेगाव (Shegaon) : राज्य सरकारने (The state government) येत्या घटस्थापना ता. ७ आक्टोबर रोजी श्री गजानन महाराज मंदीरासह राज्यभरातील मंदिर उघडण्याचा निर्णय घेवुन जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनाची धावपळ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी होणार नाही याकड़ेही श्रींच्या मंदिर व्यवस्थापनाचे लक्ष राहणार आहे. कोरोनामुळे १७ मार्च २०२१ रोजी श्रींचे मंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल ५४२ दिवसांनी नवरात्र उत्सवात विदर्भाचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज मंदीर उघडणार आहे.

    मंदिर प्रवेशाकरिता नियमावली
    ६५ वर्षावरील वृद्धांना तसेच गर्भवती महिलाना दर्शनाची अनुमती नसेल.दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनाकरीता दि. ०७/१०/२०२१ पासून खुले करण्यात येत आहे. श्री दर्शन सुविधा तुर्तास ई-दर्शन पासद्वारे राहील.श्रींचे दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्गदर्शक सूचना श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना ई-दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे, ज्या भक्तांनी स्वतः चे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट / न्ड्रॉईड फोनवरून ई-दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी ई-दर्शनपास/ पासचा आय. डी. क्रमांक सोबत आणावा. निःशुल्क ई-दर्शन पासची नोंदणी करीत असतांना तांत्रिक अडचण ८७६६५७३४८७ या मोबाईल नंबर वर २४ तास संपर्क करता येईल,आल्यास ९५२९६५८०७४ • श्री दर्शनार्थी भाविकांनी ई-दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे/नोंदविणे गरजेचे आहे

    प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई-दर्शन पास असणे बंधनकारक राहील. कोविड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती, इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये.नियमानुसार ६ फुटाचे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल. शासनाचे निर्देशानुसार १० वर्षांचे आतील व ६५ वर्षांचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेन्मेंट झोन व होम क्यारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये. प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता प्रसंगानुरूप आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार व्यवस्थापनाचे अधिन असून श्री संस्थेकडे संरक्षीत / सुरक्षीत आहेत.करीता निःशुल्क ई-दर्शनपासची सुविधा www.gajananmaharaj.org या संकेतस्थळ आहे.

    (नेट, कॅफे, सेतु तसेच स्मार्टफोनवरुण सुद्धा ई-दर्शनपासची सुविधा उपलब्ध करून घेता येईल) श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे. कृपया भाविकांनी याची नोंद घ्याची भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकुल येथे भाविकांकरीता कोविड नियमानुसार निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था उपलब्ध राहील. परिस्थितीजन्य स्थिती लक्षात घेता सेवकांकडून काही न्युनता क्षमा करावी. असेही सूचना वजा विनंती संस्थान कडून भक्ताना देण्यात आल्या आहेत.