प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शेतात काम करणाऱ्या विवाहितेचे गावातीलच १७ वर्षीय मुलावर प्रेम जुळले; तो तिला वहिनी वहिनी म्हणतं वारंवार भेटायचा. महिलेच्या सासू-सासऱ्यांना संशय आला; मात्र, तिने आपलं असं कुठलचं प्रेम प्रकरण नसल्याचं नवऱ्याला स्पष्टचं सांगितलं. त्यानही बायकोच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला; पण एकेदिवशी प्रियकराने विवाहितेसह तिच्या लहान मुलाला विष पाजून ....

    मलकापूर (Malkapur). शेतात काम करणाऱ्या विवाहितेचे (A married woman) गावातीलच १७ वर्षीय मुलावर प्रेम (love with a 17 year old boy) जुळले; तो तिला वहिनी वहिनी (Vahini Vahini) म्हणतं वारंवार भेटायचा. महिलेच्या सासू-सासऱ्यांना (The woman’s in-laws) संशय (suspicious) आला; मात्र, तिने आपलं असं कुठलचं प्रेम प्रकरण (love affair) नसल्याचं नवऱ्याला स्पष्टचं सांगितलं. त्यानही बायकोच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. पण एकेदिवशी प्रियकराने विवाहितेसह तिच्या लहान मुलाला विष पाजून (Give poison) स्वतःही विष प्राशन केले; प्रियकराने मृत्यूपूर्व दिलेल्या बयानातून घटनेमागील कारण कळले.

    बुलडाणा जिल्ह्यातील (Buldhana District) मलकापूर (Malkapur) येथील एका गावात 4 जुलैच्या मध्यरात्री घरात दोघांचे मृतदेह आढळले. या मृतकांमध्ये अल्पवयीन मुलाचे संबंध असलेली महिला आणि त्याच्या एका मुलाचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जुलैच्या मध्यरात्री हा प्रियकर विवाहित महिलेच्या घरात शिरला. याची कल्पना विवाहितेच्या सासूला आली आणि त्यानंतर तिने शेजारील आपल्या पुतण्याला बोलावले. घराचा दरवाजा ठोठावला असता काहीच प्रतिसाद आला नाही.

    घरातून विचित्र वास येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटलांना बोलवण्यात आले. त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी यावेळी ही विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह घरात गंभीर अवस्थेत आढळून आली तसेच तिचा अल्पवयीन प्रियकर हा सुद्धा गंभीर अवस्थेत होता. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विवाहित महिला आणि तिचा 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

    तर अल्पवयीन प्रियकर आणि विवाहितेचा मोठा मुलगा या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीत अल्पवयीन प्रियकराने या सर्वांना विष पाजल्याने कबुल केले. त्यानंतर स्वत: सुद्धा विष प्राशन केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.