मंदिरांवर पुन्हा कोरोनाचे सावट ; शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासनाने घेतला निर्णय

विदर्भात कोरोनाने गेल्या १० दिवसांपासून कहर केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन सतर्क झाले असून गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    बुलडाणा : राज्यभरात पुन्हा एका कोरोनाने डोकं वर काढले असून पुन्हा एकदा सर्वत्र कोरोना रुग्नांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाविकांना आता इथून पुढचे काही दिवस दर्शन घेता येणार नाही.

    विदर्भात कोरोनाने गेल्या १० दिवसांपासून कहर केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन सतर्क झाले असून गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    पुढील आदेशापर्यंत गजानन महाराज मंदिर बंद
    सद्यस्थितीत राज्यभरात कोरोना विषाणूचाा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसंच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणं शक्य नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.