धक्कादायक! घराची संरक्षक भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी परिसरात टिनपत्र्याच्या खोलीत या माय-लेकी दोघेही भाड्यानं राहात होत्या. मात्र पावसानं जरा उसंत घेतल्यानंतर एका क्षणात भिंत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. या माय-लेकी मध्य प्रदेशातील खंडवा परिसरातील मूळच्या रहिवासी आहेत.

बुलडाणा : बुलडाण्यात पावसामुळे घराची भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी परिसरात टिनपत्र्याच्या खोलीत या माय-लेकी दोघेही भाड्यानं राहात होत्या. मात्र पावसानं जरा उसंत घेतल्यानंतर एका क्षणात भिंत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं.  या माय-लेकी मध्य प्रदेशातील खंडवा परिसरातील मूळच्या रहिवासी आहेत. मृत महिलेचं नाव सुगवंती काजळे आहे. ही महिला आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या १८ वर्षीय मुलीला सैलानी येथे घेऊन आल्या. परंतु माय-लेकी मिळून ज्या ठिकाणी राहात होत्या त्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेमध्ये माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.   

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रायपूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.