धान्य दुकानदारांचे घेतले स्वॅब; एक जण बाधित

शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता तहसीलदार रूपेश खंडारे यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांची तपासणी सुरू केली. बुलडाणा तहसील कार्यालयातील तब्बल २१ अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. यामुळे तहसीलदारासह केवळ ९ कर्मचाऱ्यांवर कामकाजाची मदार आहे. तहसील कार्यालयातच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    बुलढाणा (Buldhana).  शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता तहसीलदार रूपेश खंडारे यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांची तपासणी सुरू केली. बुलडाणा तहसील कार्यालयातील तब्बल २१ अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. यामुळे तहसीलदारासह केवळ ९ कर्मचाऱ्यांवर कामकाजाची मदार आहे. तहसील कार्यालयातच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    आरोग्य विभागाचे ३ कर्मचारी कार्यालय परिसरातच रेशन दुकानंदारांचे स्वॅब नमुने घेत आहे. पहिल्या दिवशी एकूण 116 पैकी 60 जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यापैकी एका दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान आज 16 मार्चला उर्वरित 56 जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी सांगितले.