प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजनेचा लाभ घ्या; कृषी विभागाचे आवाहन

असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजना राबवली जात आहे. योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबवली जाणार आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे.

    बुलढाणा (Buldhana).  असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयान योजना राबवली जात आहे. योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबवली जाणार आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. या संबंधी वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.

    या योजनेअंतर्गत अन्नपक्रिया उद्योगाकरिता सामाईक पायाभूत सुविधा केंद्राकरिता 35 टक्के अनुदान, ब्रॅडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहायता गटांना बीज भांडवल, लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रति सभासद (4 लाख) पर्यंत अनुदान मिळेल. शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहायता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी उत्पादनावर देता येतील.

    तसेच अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतो. गट लाभार्थींनी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करता येतील, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.