देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल; भेंडवड घटमांडणीचे भाकीत जाहीर

दरम्यान, यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यासारखी पीके चांगले उत्पन्न निघेल मात्र त्याला बाजार भाव मिळणार नाही तसेच कोरोनाचे संकटातून यावर्षीही यासुटका होणार नसल्याचे स्पष्ट कारण्यात आले आहे.

    बुलडाणा: पारंपरिक पद्धतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्याला पाऊस पाण्याचे भाकीत मांडण्यासाठी बुलढाण्यातील भेंडवळच्या घट मांडणीचे भाकिताकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असे भाकित करण्यात आले आहे.

    यावेळी त्यांनी पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल. असे ही सांगितले तर देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल. अशाप्रकारे भेंडवड घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले.