Dharm kata, Buldana
हाच तो धर्मकाटा

  • अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

संग्रामपूर (Sangrampur).  बुलढाना जिल्ह्यातील टुनकी ते सोनाळा रोडवरील कृष्णा वेब्रिज धर्म काट्यावरील लुमिनस कंपनीचे इन्व्हर्टर व बॅटरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार ९ सप्टेंबरच्या रात्री धीरज खोडके हे नेहमीप्रमाणे धर्मकाटा उघडण्यासाठी गेले असता त्यांना धर्म काट्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी मालक सागर जयस्वाल यांना दिली. तेव्हा इन्व्हर्टर बॅटरी चोरी झालेली दिसली. पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार अमर चौरे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार सय्यद तपास करीत आहेत.