Honey Trap मध्ये अडकला अन गडी असा फसला की जीवच गमवावा लागला

Honey Trap मध्ये व्हडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिलाय जातात व पैशाची मागणी केली जाते. मात्र अश्या प्रकारच्या घटनांचे तुम्ही बळी ठरला असाल तर घाबरुवून न जात थेट पोलिसांबरोबर संपर्क साधा. त्यांना सत्य काय आहे ते सांगा, पण कुणालाही पैसे देण्यास बळी पडू नका.

    बुलढाणा: Honey Trap हे नाव ऐकले तरी अनेकदा राजकीय व्यक्ती, प्रशासनातील अधिकारी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. मात्र अलिकडच्या काळात मेट्रोसिटी, जिल्ह्याच्या ठिकाणी हे प्रमाण वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यपणे नागरिकांनाही हेरून हनी ट्रॅप करत असल्याचे समोर आले आहे. प्रकरणांमध्ये या महिला दिल्ली किंवा उत्तर भारतातील शहरांमधील असल्याचे दिसून आले आहे.

    Honey Trap मध्ये व्हडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिलाय जातात व पैशाची मागणी केली जाते. मात्र अश्या प्रकारच्या घटनांचे तुम्ही बळी ठरला असाल तर घाबरुवून न जात थेट पोलिसांबरोबर संपर्क साधा. त्यांना सत्य काय आहे ते सांगा, पण कुणालाही पैसे देण्यास बळी पडू नका. Honey Trap शेवटी शेवटी एवढ्या पैशांची मागणी केली जाते की, ती तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. तेव्हा अनेक जण आत्महत्या या पर्याय स्वीकारतात. या पर्याय अतिशय चुकीचा आहे. यामुळे तुमच्या परिवारातील लोकांना आयुष्यभर याची शिक्षा भोगावी लागते.

    धक्कादायक गोष्ट  म्हणजे बुलढाणासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही Honey Trap चा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या पहुरजीरा या गावात घडलाय. प्रभुदास बोळे यांच्यासोबत  सुटाळा या गावात आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने ओळख केली. यानंतर त्याला व्हिडिओ कॉल आणि ऑनलाइन चॅटिंग या विधवा शिक्षिकेने सुरु केली, ती प्रभुदास यांच्या घरी देखील येत होती. पण काही दिवसानंतर या शिक्षिकेने बोळे यांना फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी सुरू केली. त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली , त्यामुळे प्रभुदास वैतागून गेले व त्यांनी आत्महत्या केली. असे त्याच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. तर ही शिक्षिका पैशासाठी मला ब्लॅकमेल करत असल्याने आपण आत्महत्या करीत आहोत , असा मॅसेज आत्महत्येपूर्वी बोळे यांनी आपल्याला पाठवला असल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. पोलीस तपासात देखील शिक्षिका पैशासाठी तगादा लावत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या शिक्षिकेला अटक केली आहे.

    त्यानंतर देऊळगाव राजा येथे दुसरी घटना घडली आहे. पहिल्या घटनेत हनी ट्रॅपमागे आख्खी गँग असल्याचे समोर आले होते . तेव्हा देखील मैत्री करुन व्हीडिओ काढून, व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी एका महिलेने दिली होती. माझ्या मैत्रिणीला ब्युटी पार्लर काढायचे आहे. यासाठी २५ लाख रुपये दे अशी या महिलेची मागणी होती, असा आरोप तक्रारीत होता. या प्रकरणी महिलेसह २ तरुणांना अटक करण्यात आली होती.