अनियंत्रित टँकर दुकानात शिरले; दोघे गंभीर जखमी, चालकास अटक

मद्यधुंद टँकर चालकाने सुरुवातीला दुचाकीस्वारास पाठीमागून धडक दिली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या सलून दुकानात वाहन घुसवल्याची घटना नांदुरा रोडवर गौरव हॉटेलजवळ घडली. अपघातानंतर जखमींना नगरसेवकाने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी टँकर चालकास गजाआड केले.

    खामगाव (Khamgaon).  मद्यधुंद टँकर चालकाने सुरुवातीला दुचाकीस्वारास पाठीमागून धडक दिली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या सलून दुकानात वाहन घुसवल्याची घटना नांदुरा रोडवर गौरव हॉटेलजवळ घडली. अपघातानंतर जखमींना नगरसेवकाने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी टँकर चालकास गजाआड केले.

    अकोला मार्गाचे काम करणाऱ्या मोंटो कार्लो कंपनीचे टँकर क्रमांक एमएच28-बीबी-3964 29 एप्रिलच्या रात्री 11 वाजता दरम्यान बसस्थानकाकडून नांदुराच्या दिशेने भरधाव वेगात जात होते. दरम्यान कोर्टासमोरून जाणारी दुचाकी क्रमांक एमएच28-बीसी-6623 ला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीस्वार सुरेंद्र जाधव (35) व राहुल निंबाळकर (30) गंभीर जखमी झाले.

    टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे वळणावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या सलूनच्या दुकानामध्ये जाऊन घुसले. दुकानाचे नुकसान झाले असून टँकरचालकही जखमी झाला. नागरिकांनी टँकरचालकाचा पाठलाग करून त्यास पकडून शहर पोस्टेच्या ताब्यात दिले. पोलिस कारवाई करीत आहेत.