Wife opposes husband's illicit affair, slaps husband in anger

पत्नीने विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे मी एकच नाहीतर, दहा महिलांशी संबंध ठेवणार, तू मला आडवणारी कोण असे सांगून पतीने तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बुलढाणा : पत्नीने पतीच्या अवैध संबंधांना (Extramarital affair )विरोध केल्यामुळे (Wife opposes ) पतीने तिहेरी तलाख (Triple talaq) दिल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडल्याची उघडकीस आली आहे. पतीविरोधात पत्नीने मुस्लिम महिला विविह संरक्षण कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर पत्नीने विरोध केला. याआधीही पत्नीने अवैध संबंधांबाबत समजूत काढली होती. परंतु त्याचा काही परिणाम पतीवर झाला नाही. त्यामुळे यावरुन त्यांच्यात अनेकदा भांडण होत होती. (Wife opposes husband’s Extramarital affair)

पत्नीने विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे मी एकच नाहीतर, दहा महिलांशी संबंध ठेवणार, तू मला आडवणारी कोण असे सांगून पतीने तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने नव्या तिहेरी कायद्यानुसार पतीच्या आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव मोहसीन असून त्याचे पीडितेसोबत दीडवर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या नंतर पतीचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले होते. परंतु आपण त्याला विरोध करत समजूत काढली असल्याचे पत्नीने सांगितले.

पतीला वारंवार समजावूनही सुधारत नसल्यामुळे पीडितेने विवाहबाह्य संबंधांविषयी माहेरच्यांना सांगितले. हे पतीला समजल्यावर त्याला राग अनावर झाल्याने पत्नीला मारहाण केली. यानंतर मी एक नाही तर दहा महिलांशी संबंध ठेवणार मला विचारणारी तु कोण असे म्हणत तलाक…तलाक.. तलाक करुन तिहेरी तलाक दिला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पती आणि त्याच्या आईवडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.