लांडग्याने ०२ दिवसात १३ शेळ्या केल्या ठार; शेळीपालकांमध्ये भीतीचे वातावरण

लांडग्यानी शेळयांचे अशी हाल केले होते. कोनाचे मुंडके वेगळे, पाय वेगळे तर कोणा शेळयांचे पोट फाडलेले दिसले.शेतकरी मदन कुंठबरे यांच्या लांडग्यांनी पाच शेळ्या ठार केल्या तर तीन गंभीर जखमी केल्या.

    बुलढाणा (Buldhana) : चांडोळ (Chandol) येथील शेतकरी विठ्ठलसिंग कुठंबरे (Vitthal Singh Kuthambare) यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील शेळ्यावर २१ ऑगस्टच्या रात्री लांडग्याच्या हल्ल्यात (wolf attack) आठ शेळ्या ठार केल्याची घटना घडली दरम्यान दुसऱ्या रात्री परत लांडग्यांनी त्यांच्या शेजारी त्याच्या भाऊ मदन कुठंबरे यांच्या कोठयावर हल्ला करून नऊ बकऱ्यांवर हल्ला केला. त्यापैकी पाच बकऱ्या ठार झाल्या तर चार बकऱ्या गंभीर जखमी केल्या. दोन दिवसात लांडग्यांच्या हल्ल्यात १३ बकल्या ठार झाल्या असून दोन्ही भावाचं दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

    चांडोळ येथील रहीवासी असलेले शेतकरी मदन कुठवरे व विठ्ठलसिंग कुठंबरे यांचे रुईखेड रस्तावर शेत असून शेती कमी असल्यामुळे त्यांनी जोड धंधा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. २१ ऑगस्टच्या रात्री गोठयात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून अल्पभूधारक शेतकरी विठ्ठलसिंग कुठंबरे यांच्या आठ बकऱ्या ठार केल्या यात या शेतकऱ्याच ९५ हजार रुपयांचं नुकसान झाले आहे.

    २२ ऑगस्टच्या सकाळी मदन नेहमी चारापाणी करण्यासाठी सकाळी ६ वा दरम्यान गोठयावर गेला दार उघडताच शेळयांची भयानक अशी अवस्था दिसली मदन एकदम हतबल झाला लांडग्यानी शेळयांचे अशी हाल केले होते. कोनाचे मुंडके वेगळे, पाय वेगळे तर कोणा शेळयांचे पोट फाडलेले दिसले.शेतकरी मदन कुंठबरे यांच्या लांडग्यांनी पाच शेळ्या ठार केल्या तर तीन गंभीर जखमी केल्या.

    घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. घटनेची माहीती कळताच वन विभागाचे वनपाल एस.ऐ. अंबेकर, वनरक्षक एस.डी वानखेडे, वनरक्षक ऐ. बी हिवाळे वनरक्षक एस.डी भिंगारे, के. जे. उगले, एन. खान यांनी घटनेचा पंचनामा करून अंदाजे नव्वद ते पंचानऊ हजार रुपयांचे तर दुसऱ्या दुर्घटनेचे पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्याला शासनाने लवकर मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुंठबरे शेतकरी कुटुंबियांनी केली आहे.