युवतीस बदनामीची धमकी; युवकाविरूद्ध गुन्हा दाखल

तू माझ्यासोबत लग्न कर, न केल्यास तुझा फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल असे म्हणून तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वरखेड बु.येथे 12 मार्च पूर्वी घडली.

    शेगाव (Shegaon).  तू माझ्यासोबत लग्न कर, न केल्यास तुझा फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल असे म्हणून तिचा विनयभंग केला. इतकेच नाही तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वरखेड बु.येथे 12 मार्च पूर्वी घडली. या प्रकरणी ओंकार अंभोरे रा. बेलुरा ता. पातूर विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वरखेड येथील युवतीने शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, बेलोरा येथील ओंकार अंभोरे यांचे वडील व माझे वडील एकमेकांचे मित्र असल्याने घरी येणे जाणे आहे. 4 फेब्रुवारी रोजी मी घरी एकटी असताना ओंकार अंभोरे याने तिच्या घरात प्रवेश करून तू माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून विनयभंग केला. तेव्हा युवतीने आरोपीच्या हाताला झटका मारून बाहेर पडली.

    12 मार्च पर्यंत त्याने युवतीला वेगवेगळ्या फोनवरून वेळोवेळी फोन करून तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला. तुझे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही. तुझे फोटो व्हायरल करेल तसेच तिच्या भावाला सुद्धा तुझ्या बहिणीचे लग्न माझ्याशी करून न दिल्यास तिला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. यावरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय निलेश डाबेराव करीत आहेत.