2 thousand rupee notes will no longer come out of ATM machines reason behind this
ATM मशीनमधून आता 'या' कारणामुळे मिळणार नाहीये २ हजारांची नोट; क्लिक करा आणि वाचा

आरबीआयने दोन हजारच्या नोटांची छपाई बंद केली आहे. दोन हजारच्या नोटेचे संकट पहाता क्षेत्रातील ५८ एमटीएम मशीनमधून दोन हजारच्या नोटेचे कॅलिबर हटवून ५००चे लावण्यात आले आहे. जेणेकरून जास्त नोटा लोड करता येतील, अशी माहितीही मिळत आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार रूपयांच्या नोटा मिळणे सध्या बंद झाले आहे त्यामुळे आता एटीएममधून दोन हजार रूपयांची नोट मिळणार नाही. बँका सुद्धा एटीएम मशीनमधून दोन हजार रूपयांच्या नोटांचे कॅलिबर काढू लागल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यास सुरूवात केली आहे. सेंट्रल बँकेने आपल्या ५८ एटीएम मशीनमधून कॅलिबर काढले आहे. इतर बँकांचे सुद्धा म्हणणे आहे की, आता एटीएममध्ये केवळ १००, २०० आणि ५०० रुपयांच्याच नोटा लोड केल्या जाणार आहेत.

सेंट्रल बँकेचे मंडल प्रमुख एलबी झा यांनी म्हटले की, अनेक महिन्यांपासून आरबीआयकडून दोन हजारच्या नोटा मिळत नाहीत. बाजारातून सुद्धा शाखांमध्ये दोन हजारच्या नोटा खूप कमी येत आहेत.

आरबीआयने दोन हजारच्या नोटांची छपाई बंद केली आहे. दोन हजारच्या नोटेचे संकट पहाता क्षेत्रातील ५८ एमटीएम मशीनमधून दोन हजारच्या नोटेचे कॅलिबर हटवून ५००चे लावण्यात आले आहे. जेणेकरून जास्त नोटा लोड करता येतील, अशी माहितीही मिळत आहे.

युनियन बँकेचे म्हणणे आहे की, एटीएम मशीनमध्ये ५००, २०० आणि १०० च्या नोटाच लोड केल्या जात आहेत. आरबीआयकडून दोन हजारची नोट येण्याची शक्यता वाटत नाही. कारण मागील पाच महिन्यात एकदा सुद्धा दोन हजारचे बंडल आलेले नाहीत. बडोदा युपी बँकेचे रिजन-एकचे क्षेत्रीय व्यवस्थापक अखिलेश सिंह म्हणाले, आरबीआयकडून दोन हजारच्या नोटा येत नसल्याने मोठे पैसे काढणार्‍या खातेधारकांना सुद्धा ५०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. पीएनबीचे एजीएम संतोष कुमार यादव म्हणाले, दोन हजारच्या नोटांचे संकट प्रत्येक ठिकाणी आहे. शाखांमध्ये जमा करण्यासाठी येणारी दोन हजार रूपयांची नोट एटीएममध्ये भरता येणार नाही.