Income Tax Return

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न फाइल (ITR)(Income tax return) भरण्याची अंतिम तारीख अनेकदा वाढवली आहे. २०१९-२० (असेसमेंट इयर २०२०-२१) कर भरण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०२० झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न फाइल (ITR) भरण्याची अंतिम तारीख अनेकदा वाढवली आहे. २०१९-२० (असेसमेंट इयर २०२०-२१) कर भरण्याची अंतिम तारीख आता ३१ डिसेंबर २०२० झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत जर आयटीआर (ITR) भरला नाही, तर दंड म्हणून १० हजार रुपये जादा भरावे लागणार आहेत. मात्र पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना १ हजार रुपये लेट फी भरावी लागणार आहे.

करदात्यांनी जर ३१ डिसेंबरनंतर कर भरला तर करदात्याला १०,००० रुपये लेट फी भरावी लागेल. या व्यतिरिक्त ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे, अशा लोकांना लेट फी म्हणून केवळ १००० रुपये द्यावे लागतील.

आयटीआर ऑफलाईन, ऑनलाईन किंवा सॉफ्टवेअरद्वारेही दाखल करता येऊ शकतो. करदात्यांना ऑफलाइन पद्धतीने आयटीआर भरायचा असल्यास त्यांनी सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर, इन्कम टॅक्स रिटर्न सॉफ्टवेअर वर क्लिक करा आणि मेनूवर जाऊन डाउनलोड वर क्लिक करा. मग आपले असेसमेंट वर्ष निवडून ॲप्लिकेबल आयटीआर डाउनलोड करा. त्यानंतर आयटीआर फॉर्म भरा. करदाता पूर्व-भरलेला एक्सएमएल देखील डाउनलोड करू शकतो.