7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन; महागाई भत्ता,DR मुळे वाढला HRA, वाचा सविस्तर

केंद्र सरकारने (central government) एक जुलैपासून(1st July) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Central Government Employee DA) २८ टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि डीआरमध्ये ११ टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

  नवी दिल्ली : 7th Pay Commission : सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि DR (Dearness Relief) मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढला आहे. त्यासोबतच इतर भत्ताही वाढल्याने त्यांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे त्यांचा दसरा आणि दिवाळी दणक्यात साजरी करण्याचं दिवा स्वप्न मोदी सरकारने प्रत्यक्षात साकार केलंय असं म्हणायला हरकत नाही.

  याचा सर्वात जास्त फायदा HRA मध्ये झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे जानेवारी २०२० पासून जून २०२१ पर्यंत डीए आणि डीआरसह इतर सर्व भत्त्यांमध्ये कोणताही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

  केंद्र सरकारने एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये २८ टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि डीआरमध्ये ११ टक्के वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या ४८ लाखांपेक्षा जास्त क्रमचाऱ्यांना आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा झाला आहे.

  DA चा नवीन दर आता १७ टक्केंनी वाढून २८ टक्के झाला आहे. डीएसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाऊंस (HRA) मध्येही बदल झाला आहे. सरकारने HRA ला वाढवून २७ टक्के केला आहे. डीआर आणि डीएसोबतच एचआरए वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. एकप्रकरणारे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

  एचआरएमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी १-२ टक्केंनी वाढ करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या आदेशानुसार, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरांनुसार २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के HRA मिळेल. सध्या तिन्ही वर्गांसाठी २४ टक्के, १६ टक्के आणि ८ टक्के इतका एचआरए मिळतो. ५४००, ३६०० आणि १८०० असा तिन्ही कॅटेगरीसाठी कमीतकमी एचआरए होईल.

  अशी मांडली जातात HRA ची गणितं

  DoPT च्या नोटिफिकेशननुसार, आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना HRA चा लाभ घेता येत आहे. महागाई भत्ताज्याप्रमाणे वाढवण्यात आलाय, त्याचप्रमाणे एचआरए कॅलक्युलेट केला जातो. 7th Pay Matrix नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक पगार ५६००० रुपये प्रति महिना असेल तर त्याला २७ टक्केंप्रमाणे HRA मिळणार.

  उदाहरणाद्वारे जाणून घ्या सविस्तर :

  सध्याचा HRA = ५६००० रुपये X २७/१००= १५१२० रुपये महिना

  आधीचा HRA = ५६००० रुपये X २४/१००= १३४४० रुपये महिना