A seven-day ultimatum to telecom companies to refrain from imposing new rules on SMS; Troy warned of action

टेलिकॉम कंपन्यांनी हे नवे नियम अंमलात आणले नसल्याने वन टाइम पासवर्ड संदर्भात अडथळे येत आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असला, तरीही अनेक टेलिकॉम कंपन्या नवे नियम स्वीकारण्यास तयार नाही. ‘ट्राय’ने याबाबतीत काहीतरी स्वतंत्र व्यवस्था करावी, अथवा हे नियम काढून टाकावेत, अशी मागणी कंपन्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ट्रायने कंपन्यांची मागणी फेटाळत नवे नियम लागू करण्याचे सक्तीचे निर्देश दिले आहेत.

    मुंबई : केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) व्यावसायिक ‘एसएमएस’बद्दल लागू केलेले नवे नियम टेलिकॉम कंपन्यांनी अंमलात न आणल्याने नागरिकांना वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळण्यास अनेक अडथळे येत आहेत. ‘ट्राय’ने आता कंपन्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठवडाभरात नियमांची अंमलबजावणी न केल्यास कारवाइचा इशारा दिला आहे.

    ‘ट्राय’ने काही दिवसांपूर्वी व्यावसायिक एसएमएसच्या स्वरूपामध्ये बदल केला होता. नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी ‘ट्राय’ने काही एसएमएस टेम्पलेट्स तयार करून त्याची कार्यवाही सर्व टेलिकॉम कंपन्यांना करायला सांगितली होती. यामुळे फसवणूक करण्याच्या बहाण्याने एसएमएस करणाऱ्या व्यक्तींना आळा बसेल, असे ‘ट्राय’कडून सांगण्यात आले होते.

    टेलिकॉम कंपन्यांनी हे नवे नियम अंमलात आणले नसल्याने वन टाइम पासवर्ड संदर्भात अडथळे येत आहेत. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत असला, तरीही अनेक टेलिकॉम कंपन्या नवे नियम स्वीकारण्यास तयार नाही. ‘ट्राय’ने याबाबतीत काहीतरी स्वतंत्र व्यवस्था करावी, अथवा हे नियम काढून टाकावेत, अशी मागणी कंपन्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ट्रायने कंपन्यांची मागणी फेटाळत नवे नियम लागू करण्याचे सक्तीचे निर्देश दिले आहेत.

    नव्या नियमांची आखणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. एकीकडे मोबाइलद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही कठोर नियम करणे आवश्यक आहे. टेलिकॉम कंपन्यांना सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून या काळात त्यांनी आपल्या ‘एसएमएस’च्या पद्धती नोंदणीकृत करून घ्याव्यात, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी म्हंटले आहे.