व्होडाफोन ग्राहकांसाठी एक खास ऑफर, पाहा काय आहे नवीन प्लॅन ?

टेलिकॉम कंपन्यांमध्ये विविध कंपन्यांसोबतच अनेक स्पर्धा चालू असतात. जीओ, व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल, आणि आयडिया अशा टेलिकॉम कंपन्यांमध्ये मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे व्होडाफोनच्या

टेलिकॉम कंपन्यांमध्ये विविध कंपन्यांसोबतच अनेक स्पर्धा चालू असतात. जीओ, व्होडाफोन, एअरटेल, बीएसएनएल, आणि आयडिया अशा टेलिकॉम कंपन्यांमध्ये मार्केटमध्ये स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे कंपनी आपल्या ५ प्रीपेड रिचार्जवर ५ जीबी पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. व्होडाफोनचे हे प्लॅन वेगवेगळ्या किंमतीत आणि वैधतेत येत असून, या प्लॅनमध्ये १४९ रुपये, २१९ रुपये, २४९ रुपये ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांचा समावेश आहे. 

 पाहा कोणत्या प्लॅनवर किती डेटा उपलब्ध ?

व्होडाफोन कंपनीचा ४९ रूपये ते ५९९ रूपयांपर्यंत रिचार्ज उपलब्ध आहे. त्यामध्ये आता ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या पॅक्सवर जास्तीचा डेटा दिला जात आहे. व्होडाफोनच्या १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटासोबत १ जीबी डेटा फ्री दिला जात आहे.

याप्रमाणे दुसरा २१९ रुपयांचा प्लॅन आहे. ज्यामध्ये रोज १ जीबी डेटा मिळत होता. आत या प्लॅनमध्ये २ जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्रमाणे २८ जीबी ऐवजी ग्राहकांना ३० जीबी डेटा मिळणार आहे. रोज १.५ जीबी डेटा देणाऱ्या २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या तीन प्लॅनमध्ये ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळत आहे.