Mumbai मध्‍ये शुद्ध पाणी देण्‍याकरिता ल्‍युब्रिझोल व प्रिन्‍स पाईप्‍स फ्लोगार्ड प्‍लस सीपीव्‍हीसी मध्‍ये करार

ल्‍युब्रिझोल अ‍ॅडवान्स्ड मटेरिअल्‍स इन्‍क. ही जगभरातील सीपीव्‍हीसी कंपाऊंडची संशोधक व सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.ने आज भारतामध्‍ये प्रिन्‍स फ्लोगार्ड® प्‍लस सीपीव्‍हीसी (क्‍लोरिनेटेड पॉलिव्हिनायल क्‍लोराईड) पाईप्‍स आणि फिटिंग्‍जचे उत्‍पादन व विक्रीसाठी फ्लोगार्ड® सीपीव्‍हीसी प्रोसेसर करारावर स्‍वाक्ष-या केल्‍या.

मुंबई : ल्‍युब्रिझोल अ‍ॅडवान्स्ड मटेरिअल्‍स इन्‍क. ही जगभरातील सीपीव्‍हीसी कंपाऊंडची संशोधक व सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.(PRINT PIPES AND FITTINGS LTD) ने आज भारतामध्‍ये प्रिन्‍स फ्लोगार्ड® प्‍लस सीपीव्‍हीसी (क्‍लोरिनेटेड पॉलिव्हिनायल क्‍लोराईड) पाईप्‍स आणि फिटिंग्‍जचे उत्‍पादन व विक्रीसाठी फ्लोगार्ड® सीपीव्‍हीसी प्रोसेसर करारावर स्‍वाक्ष-या (agreement signed) केल्‍या. प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.च्‍या माध्‍यमातून फ्लोगार्ड प्‍लस उत्‍पादने भारतामध्‍ये सप्‍टेंबरपासून उपलब्‍ध असतील.

या सहयोगाबाबत बोलताना प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. पराग छेडा म्‍हणाले, ”ल्‍युब्रिझोलसोबतचा आमचा सहयोग लक्षणीयरित्‍या आमच्‍या क्षमतांना वाढवतो आणि बाजारपेठेतील आमची गतीशीलता अधिक प्रबळ करतो. प्रिन्‍स पाइप्‍सच्‍या प्रबळ वितरण नेटवर्कसोबत संयोजित ल्‍युब्रिझोलची ब्रॅण्‍ड इक्विटी भारतीय पाईपिंग उद्योगक्षेत्रामध्‍ये प्रबळ व स्थिर सहयोग निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍हाला भारतीयांच्‍या सर्वसमावेशक गरजा माहित आहेत आणि आम्‍ही नवीन तंत्रज्ञानांचा लाभ घेत गृहमालक, सल्‍लागार व बिल्‍डर्सना पसंतीचा जागतिक ब्रॅण्‍ड व दर्जात्‍मक उत्‍पादनाचा लाभ देण्‍यास कटिबद्ध आहोत.”

”ल्‍युब्रिझोल भारतातील उष्ण आणि थंड पाण्याच्या प्लंबिंग बाजारपेठेला सेवा देण्यासाठी उच्च दर्जाच्या सीपीव्हीसी कंपाऊंडचा पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रिन्‍स पाईप्‍स ॲण्‍ड फिटिंग्‍ज लि.सोबतचा हा सहयोग भारतातील लाखो नागरिकांना प्रिन्‍स पाईप्‍सच्‍या भारतभरातील प्रबळ वितरण नेटवर्क व धोरणात्‍मकरित्‍या स्‍थापित उत्‍पादन सुविधांच्‍या माध्‍यमातून शुद्ध पाण्‍याचा पुरवठा करण्‍याच्‍या फ्लोगार्ड प्‍लसच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करेल,” असे टेम्‍पराइट® इंजिनिअर्ड पॉलिमर्सचे महाव्‍यवस्‍थापक विन्‍स मिसिटी म्‍हणाले.