१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमेतेने सुरु होणार विमान प्रवास, हवाई सफरीचे तिकिट दर कमी होण्याची शक्यता, केंद्र सरकारने दिली मंजुरी

हवाई उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्या आणि प्रवाशांना दिलासा दिला असला, तरी कोविडच्या प्रतिबंधत्मक नियमांचे पालन करणे प्रवासात गरजेचे असणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये विमानातील प्रवासी क्षमता ८५ टक्के करण्याची परवानगी सरकारने दिली होती. तर जुलैमध्ये ही मर्यादा ६५ टक्क्यांवर होती.

    नवी दिल्ली : विमान कंपन्या (Airlines) आणि देशांतर्गत विमान प्रवास (Domestic air travel) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. १८ ऑक्टोबरपासून विमानातील १०० टक्के सीटची तिकीटविक्री (Ticket sales) करण्याची परवानगी, सरकारने विमान कंपन्यांना दिली आहे. देशातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस कमी होत चाललेली संख्या पाहता, प्रवासी क्षमतेवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुले हवाई प्रवासासाठीच्या तिकिटांचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.

    हवाई उड्डाण मंत्रालयाने विमान कंपन्या आणि प्रवाशांना दिलासा दिला असला, तरी कोविडच्या प्रतिबंधत्मक नियमांचे पालन करणे प्रवासात गरजेचे असणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये विमानातील प्रवासी क्षमता ८५ टक्के करण्याची परवानगी सरकारने दिली होती. तर जुलैमध्ये ही मर्यादा ६५ टक्क्यांवर होती.

    कोरोना महामारीला रोखण्यासाठी २३ मार्च २०२० रोजी सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यानंतर मे २०२० मध्ये वंदे भारत मिशनअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय विमानांना परवानगी देण्यात आली होती.