युजर्सला लेज, अंकल चिप्स आणि कुरकुरेवर मिळणार २ जीबी फ्री डेटा

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या प्रिपेड ग्राहकांना २ जीबी डेटा मोफत ऑफर करत आहे. यासाठी ग्राहकांना PepsiCoची वस्तू विकत घ्यावी लागेल, यासोबत मिळणारा कूपन कोड वापरून फ्री डेटा मिळणार आहे.

मुंबई : भारती एअरटेल  (Bharti Airtel) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असते. आता एका नव्या सुविधेअंतर्गत कंपनी आपल्या प्रिपेड ग्राहकांना २ जीबी मोफत डेटा ऑफर करत आहे. यासाठी एअरटेलने खाद्यपदार्थ विक्री करणारी कंपनी PepsiCo (पेप्सीको) सोबत भागीदारी केली आहे. ऑफर अंतर्गत पेप्सीकोचे फूड, स्नॅक्स, आणि बेवरेज खरेदी केल्यानंतर मिळणाऱ्या एका कूपनकोडच्या माध्यमातून एअरटेल प्रिपेड ग्राहकांना २जीबीपर्यंत मोफत डेटाचा लाभ मिळणार आहे.

असा मिळणार 2GB फ्री डेटा

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, Lays चिप्स, Doritos आणि कुरकुरे सारखे पेप्सिको प्रॉडक्टच्या सर्व प्रमोशनल पॅकसोबत एक कुपनकोड देण्यात येणार आहे. एअरटेल प्रिपेड ग्राहक या कोडचा जास्तीत जास्त ३ वेळा वापर करू शकतील. तीनही वेळेला वेगवेगळा कोड असणं गरजेचं आहे. हा 12 अंकी Airtel Promo कोड प्रमोशनल पाकिटाच्या आतल्या बाजूस लिहिलेला असणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कोड मिळाल्यानंतर युजर्स Airtel Thanks च्या माध्यमातून My Coupons सेक्शन मध्ये जाऊन याचा लाभ घेऊ शकतील. प्रत्येक कोडवर वेगवेगळ्या रकमेचा फ्री डेटा मिळणार आहे, जो पाकिटाच्या किंमतीवर अवलंबून असणार आहे. यावर युजर्सने लक्ष देणे गरजेचे आहे. ही ऑफर ३ ऑगस्ट२०२० पासून सुरू होणार असून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत असणार आहे. असे केल्यास युजर्सला डेटा मिळणार असून ३१ जानेवारीपर्यंत तो कधीही रिडिम करता येणार आहे. ऑफर अंतर्गत मिळणारा फ्री डेटा ३ दिवस वापरता येणार आहे.

या वस्तू खरेदी केल्यानंतर मिळणार कोड

हा युनिक कोड चार प्रकारच्या वस्तू Lays चिप्स, Doritos, कुरकुरे आणि अंकल चिप्ससोबत मिळणार आहे. हा कोड १० रुपये आणि २० रुपयांच्या, दोन्ही किंमतीच्या पाकिटाच्या आत लिहिलेला असणार आहे. युजर्सला खरेदी केलेले पाकिट हे प्रोमो ऑफरचं आहे याची खात्री करूनच ते घ्यावं लागणार आहे.