amazon great indian festival sale tcl tv available with 80000 rupees discount and much more
Amazon Great Indian Festival Sale: टीव्हीवर मिळणार ७१ हजारांहून अधिक सूट आणि बरंच काही

जर तुम्ही, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन घेण्याच्या विचारात असाल तर ॲमेझॉन सेलमध्ये (Amazon Great Indian Festival Sale) आपल्याला नामी संधी चालून आली आहे. या सेलमध्ये टीव्हीवर 79,991 रुपयांपर्यंत सूट (discount) मिळणार आहे.

नवी दिल्ली : ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. फेस्टिवल सेल १७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. ॲमेझॉन इंडियाच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, होम अप्लायसेस, टीव्ही सारख्या उत्पादनांवर भरघोस सूट देण्यात येत आहे.याशिवाय एसी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटरवरही बंपर ऑफर्स आहेत. ॲमेझॉन सेलमध्ये एचडीएफसीच्या कार्डवर खरेदी केल्यावर १० टक्के तात्काळ डिस्काऊंटही मिळणार आहे. जाणून घेऊयात या सेलमध्ये मिळणाऱ्या टॉप डिल्सबाबत…

White-Westinghouse वॉशिंग मशीन: 9,799 रुपये

9 किलोग्राम क्षमतेची व्हाइट-वेस्टिंग हाऊस सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 9,799 रुपयांना विकत घेता येईल. तर 8 किलोग्राम वॉशिंग मशीन 8,799 रुपये आणि ७ किलोग्राम वॉशिंग मशीन 7,299 रुपयांना विकत घेता येईल.

Samsung Galaxy S10 Plus: 44,990 रुपये

गेल्यावर्षी बाजारात दाखल झालेला सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस 10 ॲमेझॉनवर 79 हजार रुपयांऐवजी 44, 999 रुपयांना विकत घेता यईल. प्रिमियम फोन 9 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल. गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6.4 इंच क्वाड एचडी +कर्व्ड डायनामिक एमोलेड डिस्प्ले, एक्सिनॉस 9820 प्रोसेसर,12 जीबी पर्यंत रॅम व 1 टीबी इनबिल्ट स्टोरेज व 4100mAh बॅटरी दिलेली आहे.

TCL 55-inch 4K Ultra HD TV: 58, 500 रुपयांत उपलब्ध

टीसीएलचा हा 55 इंच अँड्रॉइड टीव्ही ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये 58,500 रुपयांना विकत मिळेल. हा टीव्ही डॉल्बी एटमस आणि डीटीएस सपोर्टसह 30 वॅटच्या स्पीकर्ससोबत येतो.

Samsung 810 L Frost Free साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर : 2,64,000 रुपयांत उपलब्ध (86,000 रुपयांच्या सूट सह) सॅमसंगचा हा IoT इनेबल स्मार्ट रेफ्रिजरेटर 2,64,000 रुपयांना विकला जात आहे. ॲमेझॉनवर या फ्रिजवर 86,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

Apple iPhone 7: 24,999 रुपये

ॲपल आयफोन 7 स्मार्टफोन ॲमेझॉन सेलमध्ये 31,500 रुपयांच्या सूटसह 24,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Huawei Watch GT 2 Premium: 18,990 रुपये

हुवावे वॉच GT 2e ॲमेझॉन सेलमध्ये 18,990 रुपयांत उपलब्ध आहे. हा पेबल ब्राउन रंगात मिळेल. या वॉचमध्ये 1.39 इंच एमोलेड डिस्प्ले आहे. यात किरिन ए1 चिपसेट आहे जो विशेषत: यासाठीच डिझाइन करण्यात आलेला आहे. सेलमध्ये हुवावे वॉच जीटी 2 क्लासिक 14,990 रुपयांत आणि हुवावे वॉच जीटी 2 स्पोर्ट 12,990 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हुवावे वॉच जीटी 2ई आता सेलमध्ये 9,990 रुपयांत मिळेल.

HUAWEI BAND 4: 1,799 रुपये

हुवावे बँड 4 ॲमेझॉन सेलमध्ये 1,799 रुपयांत खरेदी करता येईल. या डिव्हाइसमध्ये 91mAh बॅटरी आहे ती 9 दिवस चालेल असा दावा कंपनीने केला आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मोड डिटेक्टर दिले आहेत.

Voltas 1.5 Ton Wi-Fi split AC: 31,990 रुपयांत उपलब्ध (24,000 रुपयांची सूट)

वोल्टास 1.5 टन एसी एलेक्सा सपॉर्टसह येतो. हा एसी ॲमेझॉनवर 24 हजारांची सूट असल्याने 31,990 रुपयांना खरेदी करता येऊ शकेल.

LG 9 किलोग्राम वाय-फाय फुल ऑटोमॅटिक फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन :

43,900 रुपयांत उपलब्ध (8,000 रुपयांची सूट) 51,900 रुपयांची एलजी फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन्स वाय-फाय कनेक्टिविटीसह येतात. 8 हजार रुपयांची सूट मिळाल्यानंतर या 43,900 रुपयांना खरेदी करता येतील.

OnePlus Y सीरीज 32-इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही : 13,990 रुपयांत उपलब्ध (6,009 हजार रुपयांची सूट)

19,999 रुपयांच्या यादीत या 32 इंच वनप्लस वाय सीरीज स्मार्ट टीव्ही ॲमेझॉन सेलमध्ये 13,990 रुपयांना विकत घेता येईल.