चक्क ५ रूपयांत खरेदी करता येणार सोनं; Amazon च्या ‘या’ नव्या सेवेला सुरूवात

ग्राहकांना आता चक्क पाच रूपयांत सोनं खरेदी करता येणार आहे. ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननं आपल्या अ‍ॅमेझॉन पेसेवेद्वारे ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई : ग्राहकांना आता चक्क पाच रूपयांत सोनं खरेदी करता येणार आहे. ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननं आपल्या अ‍ॅमेझॉन पेसेवेद्वारे ही संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना आणि गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीनं ‘गोल्ड व्हॉल्ट’ सेवा सुरू केली आहे.

कंपनीने या सेवेसाठी सेफगोल्डसोबत करार केला आहे त्यामुळे ‘गोल्ड व्हॉल्ट’ सेवेद्वारे गुंतवणुकदाराला कमीतकमी पाच रूपयांचं सोनं खरेदी करता आहे. पेटीएम, फोनपे, गुगल पे, मोबिक्विक, अ‍ॅक्सिस बँकेच्या फ्रिचार्ज यांमार्फत अ‍ॅमेझॉनच्या आधीपासूनच डिजिटल माध्यमांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात येत आहे. या सर्वांशी स्पर्धा करण्यासाठी आता अ‍ॅमेझॉननेही ‘गोल्ड व्हॉल्ट’ ही सेवा सुरू केली आहे.

“कंपनी ग्राहकांसाठी काही नवं देण्याचा सतत प्रयत्न करत असते. ‘गोल्ड व्हॉल्ट’मध्ये सर्वांना कधीही सोनं खरेदी करण्याची आणि त्याचीविक्री करण्याची सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना कमीतकमी पाच रुपयांमध्ये सोनं खरेदी करता येणार आहे. ग्राहक अ‍ॅमझॉन पे वर जाऊन‘गोल्ड व्हॉल्ट’चा पर्याय स्वीकारून डिजिटल सोन्याची खरेदी करू शकतात,” अशी माहिती अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.