amazon wow salary days opportunity buy tv ac and fridge half price you will get new discount
घरच्या वापरातील वस्तू निम्म्या किंमतीत TV, AC व फ्रिज खरेदी करण्याची संधी; 'या' तारखेपर्यंत मिळणार डिस्काउंट

Amazon WOW Salary Days घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.

नवी दिल्ली : आता फेस्टिव्ह सीजन (festive season) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स कंपन्या (e commerce companies) सेल (sale) बाजारात आणत आहे. तर ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी अ‍ॅमेझॉनने (amazon) आता Wow सॅलरी डेज (Amazon Wow Salary Days Sale 2020) सेल आणला झाला आहे. यामध्ये घरच्या वापरातील काही महत्त्वाची उपकरणे, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर इत्यादींवर खूप चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.

घरातील उपकरणांवर 50% पर्यंतची सूट

अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये घरातील वापराच्या उपकरणांवर 50 टक्के पर्यंतची सूट मिळत आहे. तोशिबा आणि फॉक्सस्कार यासारख्या ब्रँडचे नुकतेच लाँच झालेले वॉशिंग मशिन या सेलमध्ये उपलब्ध आहेत. या मशिनची किंमत 7499 रुपयापासून सुरू होते आहे.

याचबरोबर, रेफ्रिजरेटरवर 35% सूट, व्होटलास, डॅकिन एलजी, गोदरेज आणि सान्योसह इतर अनेक ब्रँडच्या एसीवर 40% सूट देण्यात आली आहे. याशिवाय, टीव्हीवर 30% सवलत आणि 4 के टीव्हीवर 30% सूट या सेलमध्ये मिळत आहे. तसेच, बोट, जेबीएल, एमआय आणि इतर साऊंडबारवर 30% सूट मिळत असून इतर टॉप ब्रँडच्या स्पीकर्स आणि हेडफोनवर 50% पर्यंतची सवलत देण्यात आली आहे.

कंप्युटर डिव्हाइस व अ‍ॅक्सेसरिजवर सुद्धा ऑफर

कंप्युटर डिव्हाइस आणि अ‍ॅक्सेसरिजवर 50 टक्के पर्यंतची सवलत दिली आहे. तसेच, लॅपटॉपवर 35%, गेमिंगवर 40% आणि स्मार्टवॉच, हार्ड ड्राईव्ह आणि एसएसडी वर देखील 40% पर्यंतची सूट देण्यात आली आहे.