कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानींनी कंपनी विकायला काढली; रिलायंस होम फायनान्ससाठी 2900 कोटींची बोली

कर्जाच्या प्रचंड बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिलायन्स समूहातील रिलायंस होम फायनान्स ही दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेण्यासाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून रिलायन्स होम फायनान्ससाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट तब्बल 2900 कोटी रुपये मोजणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,587 कोटी रुपये मिळतील.

    मुंबई : कर्जाच्या प्रचंड बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिलायन्स समूहातील रिलायंस होम फायनान्स ही दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेण्यासाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून रिलायन्स होम फायनान्ससाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट तब्बल 2900 कोटी रुपये मोजणार आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,587 कोटी रुपये मिळतील.

    एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला 90 टक्के म्हणजे 2,587 कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल, असे सांगितले जात आहे. या व्यवहारामुळे रिलायन्स समूहावरील कर्जाचा बोझा 11200 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. तर रिलायन्स कॅपिटलची हिस्सेदारी 25 टक्क्यांनी कमी होणार आहे.

    रिलायन्स होम फायनान्सच्या लिलाव प्रक्रियेला 31 मे रोजी सुरुवात झाली होती. येत्या 19 जूनला ही प्रक्रिया संपुष्टात येत आहे. बँकांच्या समूहाकडून ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. अनेक बड्या कंपन्यांनी रिलायन्स होम फायनान्स विकत घेण्यासाठी बोली लावली होती. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड ही बिगरबँकिंग वित्तीय संस्था आहे. गेल्या 15 वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचे नेटवर्थ 1500 कोटींच्या आसपास आहे.

    हे सुद्धा वाचा