लोढा ग्रुप तर्फे ‘कासा ग्रीनवूड’ची घोषणा

मुंबई : लोढा ग्रुप या भारतातील सर्वांत मोठ्या रिअल इस्टेट विकासक कंपनीने ठाणे येथील अमारामध्‍ये त्‍यांचा प्रिमिअम जीवनशैली प्रकल्‍प ‘कासा ग्रीनवूड’ची घोषणा केली आहे. सुरक्षित खुल्‍या जागांसाठी ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजा जाणून घेत कासा ग्रीनवूडमधील सदनिकांमध्‍ये डेक्‍स व खाजगी बागा, मोठी घरे व २ एकर जंगलाचे सान्निध्‍य अशा सुविधा परिसरांतर्गत विकसित केलेल्‍या असतील. अधिक हरित व खुल्‍या जागांच्‍या उपलब्‍धतेमुळे आरोग्‍यदायी राहणीमानाला चालना मिळेल. सदनिकांची किंमत रू. १.०८ कोटीपासून असून प्रत्‍येक कासा ग्रीनवूड गृहखरेदीदाराला पर्यावरणांतर्गत आरामदायी राहणीमानाचा आनंद घेता येईल. तसेच सर्व आवश्‍यक दैनंदिन सेवा देखील सुलभपणे उपलब्‍ध होतील. लोढाचा हा प्रकल्‍प उच्‍च एअर क्‍वॉलिटी इंडेक्‍स व शुद्ध, हरित वातावरणासाठी देखील मान्‍यताकृत आहे.

कासा ग्रीनवूड गृहखरेदीदार लोढाच्‍या ड्रिम डीलचा लाभ घेऊ शकतात. ही डील निर्माणाधीन प्रॉपर्टीच्‍या खरेदीसंदर्भात येणा-या समस्‍यांचे निराकरण करते. बुकिंग रक्‍कमेमध्‍ये घट आणि फक्‍त ५० टक्‍के स्‍टॅम्‍प ड्युटीसह ब्रॅण्‍ड गृहखरेदीदारांना त्‍यांच्‍या घराचा ताबा मिळेपर्यंत खरेदी केलेल्‍या सदनिकेनुसार अमारामध्‍ये किंवा बाहेर भाडेतत्त्वावरील घरासाठी प्रतिमहिना रू. ३०,०००/- परतफेड करेल. यामुळे गृहखरेदीदाराला ईएमआय वरील अतिरिक्‍त भारावर, तसेच भाड्यावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होईल आणि त्‍यांना त्‍यांच्‍या घराचा ताबा मिळेपर्यंत विना घरभाड्याशिवाय अमारामध्‍ये राहण्‍याची संधी मिळेल.

कासा ग्रीनवूडच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना लोढा ग्रुपच्‍या मध्‍यम उत्‍पन्‍न व वाजवी दरातील गृहनिर्माण विभागाचे अध्‍यक्ष प्रतीक भट्टाचार्य म्‍हणाले, ”ग्राहक-केंद्रित ब्रॅण्‍ड असल्‍यामुळे आम्‍ही नेहमीच ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक भावनांना समजून घेतले आहे. ब्रॅण्‍डने नेहमीच ग्राहकांच्‍या गरजा व मागण्‍यांची पूर्तता करणा-यानाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सचा शोध घेण्‍याला प्राधान्‍य दिले आहे.

कोलशेत रोडवर असलेला हा प्रकल्‍प कापूरबावडी मेट्रो स्‍टेशनपासून ५ मिनिटांच्‍या अंतरावर आहे, तसेच घोडबंदर रोड व ईस्‍टर्न एक्‍स्‍प्रेस हायवेपासून देखील जवळच आहे. २ मिनिटांच्‍या पायी अंतरावर गृहखरेदीदारांना लोढा बिझनेस डिस्ट्रिक्‍टमधील आगामी व्‍यावसायिक क्षेत्रांची देखील उपलब्‍धता होईल. या बिझनेस डिस्ट्रिक्‍टमध्‍ये २५ हून अधिक एफ ॲण्‍ड बी ब्रॅण्‍ड्स आणि ३ कॉर्पोरेट इमारतींसह १५ हजार कर्मचा-यांचा समावेश असेल. ही प्रॉपर्टी शांतता व आरामदायी सुविधेसह उत्तम कनेक्‍टीविटी व उपलब्‍धतेची खात्री देते.