Appointment of Chen Si Yen as General Manager of Singapore Airlines in India vb

भारतातील जनरल मॅनेजर पदावरील नियुक्ती नंतर आपल्या नव्या भूमिकेत चेन यांच्यावर देशातील कंपनीच्या व्यवसायाची उद्दिष्टे सुनिश्चित करणे आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड (SIA) च्या जागतिक दृष्टीचे परिपोषण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबई : सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड (SIA) ने चेन सी येन यांची २९ नोव्हेंबर २०२० पासून भारताचे नवे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. चेन सी येन हे डेव्हिड लिम यांची जागा घेतील, त्यांनी चार वर्षे सिंगापूर एअरलाइन्स इंडियाचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. लिम यांचे कौशल्य आणि नेतृत्व यांनी सिंगापूर एअरलाइन्सच्या भारतातील कामकाजाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला.

लिम यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर चेन यांच्यावर आता सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड (SIA) च्या भारतातील सर्व कामांची जबाबदारी असेल. यापूर्वी चेन सी येन यांनी फ्रॅंकफर्ट मधून सुरुवात करून जर्मनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१७ मध्ये स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिंगापूर एअरलाइन्ससाठी काम केले आहे. भारत हि एअरलाइन्ससाठी महत्वाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे, भारतातील जनरल मॅनेजर पदावरील नियुक्ती नंतर आपल्या नव्या भूमिकेत चेन यांच्यावर देशातील कंपनीच्या व्यवसायाची उद्दिष्टे सुनिश्चित करणे आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड (SIA) च्या जागतिक दृष्टीचे परिपोषण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मला वाटते की जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात मिळालेल्या काम करण्याच्या संधीमुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, तसेच मी काम करण्यास उत्सुक आहे.

चेन सी येन, सिंगापूर एअरलाइन्स