Apple चे सीईओ टिम कुक यांची कमाई ७५ कोटी डॉलर्स, दान केली एवढी रक्कम

Apple चे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी १० वर्षांपूर्वी कंपनीची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्यांना सॅलरी पॅकेज डिल मध्ये कंपनीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा मिळाला होता. आता या शेअर्समुळेच त्यांना फायनल पे आऊट म्हणून जवळपास ७५ कोटी डॉलर्स म्हणजेच ५५६० कोटी रुपये मिळाले आहेत.

  मुंबई : iPhone तयार करणारी टेक कंपनी Apple Inc. चे सीईओ टिम कुक यांची कमाई 75 कोटी डॉलर (जवळपास ५,५६० कोटी रुपये) झाली आहे.त्यांच्या या कमाईत एक मोठा हिस्सा कंपनीच्या शेअर्सच्या विक्रीवर मिळालेल्या परताव्याचा आहे. जाणून घ्या सविस्तर

  Apple चे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी १० वर्षांपूर्वी कंपनीची सूत्रे हाती घेतली त्यावेळी त्यांना सॅलरी पॅकेज डिल मध्ये कंपनीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा मिळाला होता. आता या शेअर्समुळेच त्यांना फायनल पे आऊट म्हणून जवळपास ७५ कोटी डॉलर्स म्हणजेच ५५६० कोटी रुपये मिळाले आहेत.

  टिम कुक यांनी विकले एवढे शेअर्स

  ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार Apple चे सीईओ टिम कुक यांच्याकडे कंपनीचे जवळपास ५० लाख शेअर्स आहेत. कंपनीने अमेरिकेच्या मार्केट रेग्युलेटर SEC ला जी माहिती दिली आहे त्या हिशेबाने याचा एक मोठा हिस्सा टिम कुक यांनी विकला आहे आणि त्याचे मूल्य जवळपास ७५ कोटी डॉलर्स एवढा होतो.

  Apple च्या शेअर्सचे रिटर्न्स

  टिम कुक यांनी २४ ऑगस्ट २०११ ला जेव्हा Apple चे संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांची जागा घेतली होती, तेव्हा सॅलरी पॅकेज डिल यावर अवलंबून होती की, कंपनीचे शेअर्स S&P ५०० स्टॉक एक्सचेंजमध्ये किती रिटर्न्स देतात.

  जर गेल्या १० वर्षांबाबत बोलायचं झालं तर तेव्हापासून आत्तापर्यंत Apple च्या शेअर्सची किंमत १,२०० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीच्या शेअर्सनी १९१.८३ चे रिटर्न्स देण्यात आले आहेत. कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आता २,५०० अरब डॉलर (जवळपास १,८४,७०५ कोटी रुपये) झालं आहे.

  एवढ्या कोटी डॉलर्सचं केलं आहे दान

  ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स नुसार आजच्या घडीला टिम कुक यांची एकूण संपत्ती १.५ कोटी रुपये म्हणजेच ११० कोटी रुपये आहे. तथापि २०१५ मध्ये टिम कुक यांनी म्हटलं होतं की, आपल्या मृत्यूपूर्वी ते आपली सर्व संपत्ती दान करणार आहेत. SEC च्या आकडेवारीनुसार या आठवड्याच्या सुरूवातीलाच त्यांनी १ कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५ कोटी रुपये दान केले आहेत.

  टिम कुक यांचं १० वर्षांचं सॅलरी पॅकेज ॲग्रीमेंट संपलं आहे आणि आता त्यांनी २०२६ पर्यंत एक नवीन डिल साइन केली आहे.