एएससीआयकडून ‘या’ महिन्यांमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या २५७ जाहिरातींविरोधात तक्रारींचे निराकरण

एएससीआयच्या स्वतंत्र कन्झ्युेमर कम्प्लेण्टस कौन्सिल (CCC)ने उर्वरित २८७ जाहिरातींची कसून चौकशी केली, ज्यापैकी २५७ जाहिरातींविरोधातील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यापैकी १५० जाहिराती आरोग्य सेवा विभागाशी, ४० जाहिराती शिक्षण विभागाशी, २० जाहिराती अन्न व पेय विभागाशी, ४ जाहिराती जीएएमए तक्रारींशी, १२ जाहिराती पर्सनल केअरशी आणि ३१ जाहिरातील इतर विभागाशी संबंधित होत्या.

मुंबई : वर्ष २०२० मधील जून (June) व जुलै (July) महिन्यांमध्ये ॲडव्हहयर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियाने (Advertising Standards Council of India) ३६३ जाहिरातींविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींसंदर्भात चौकशी (Enquiry) केली, ज्यापैकी ७६ जाहिराती जाहिरातदारांनी त्वरित मागे घेतल्या. एएससीआयच्या स्वतंत्र कन्झ्युेमर कम्प्लेण्टस कौन्सिल (CCC)ने उर्वरित २८७ जाहिरातींची कसून चौकशी केली, ज्यापैकी २५७ जाहिरातींविरोधातील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यापैकी १५० जाहिराती आरोग्य सेवा विभागाशी, ४० जाहिराती शिक्षण विभागाशी, २० जाहिराती अन्न व पेय विभागाशी, ४ जाहिराती जीएएमए तक्रारींशी, १२ जाहिराती पर्सनल केअरशी आणि ३१ जाहिरातील इतर विभागाशी संबंधित होत्या.

कोविड-१९ विरोधातील लढा सुरू असण्यासोबत कोरोना विषाणूसाठी उपचार व प्रतिबंधाबाबत खोटे दावे करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आयुष मंत्रालयासोबत सहयोगाने एएससीआय समाजाच्या हितासाठी अशा खोट्या दाव्यांचे निर्मूलन करण्याप्रती सातत्याने काम करत आहे. मे ते जून महिन्यांदरम्यान नियामकाकडे अशा ९७ केसेसच्या तक्रारी करण्याात आल्याा.

एएससीआयचे अध्यक्ष सुभाष कामत याबाबत सांगताना म्हणाले की, ”कोविड-१९ साठी उपचार व प्रतिबंधाबाबत खोटे दावे करणा-या जाहिरातींमध्येत वाढ होत आहे. विशेषत: ग्राहकांना विषाणूबाबत अधिक असुरक्षितता वाटत असताना त्यामध्ये खूपच वाढ झाली आहे. आमच्याासारख्यात नियामकांसाठी या जाहिराती ग्राहकांच्या चिंतेमध्ये वाढ करणार नाहीत याची खात्री घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला माहित आहे की, अशा प्रकारचे खोटे दावे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. आम्ही आयुष मंत्रालयासोबत सहयोगाने काम करत समाजहितासाठी अशा प्रकारच्या खोट्या दाव्यांचे निर्मूलन करण्याप्रती कटिबद्ध आहोत.